प्रतिनिधी/ बेळगाव
किल्ला परिसरात असणाऱया आराधना या दिव्यांग (गतिमंद-मतिमंद) मुलांच्या शाळेत कनकदास जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी कनकदासांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सर्व शिक्षकांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी रशीदभाई, मारुती कुंभार, द्वारकाताई पाटील, नंदा लोहार, अश्विनी पवार व शिक्षक उपस्थित होते. कोविड 19 च्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला.









