चलनविषयक धोरण समितीची बैठक सुरू व्याजदर निश्चितीबाबत उद्या निर्णय होणार
मुंबई / वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक बुधवारी सुरू झाली. दर दोन महिन्यांनी घेण्यात येणाऱया या पतधोरण आढाव्याचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात येईल. एप्रिलमध्ये झालेल्या मागील बैठकीत व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. सध्याचा रेपो दर 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्के आहे. कोविड-19 साथीच्या दुसऱया लाटेचा उदेक झाल्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. महागाई दरात वाढ होण्याची भीती असतानाही या काळात व्याजदरात बदल होण्याची फारशी आशा नाही, असा दावा अर्थतज्ञ करत आहेत.









