इलेक्ट्रिक कार निर्मितीसाठी टेस्ला उत्सुक – कारला सुविधेअभावी मागणी कमी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आपला कारखाना भारतामध्ये सुरू करण्यासाठी इच्छुक असून यासंदर्भात टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी भारत सरकारला आयात शुल्कामध्ये कपात करण्याची विनंती केली असल्याचे समजते.
टेस्ला कंपनीला आपला इलेक्ट्रिक कार निर्मितीचा कारखाना भारतामध्ये सुरू करावयाचा आहे. भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेमध्ये आयात शुल्क जास्त असल्यामुळे कारखाना सुरू करणे आम्हाला अडचणीचे ठरत आहे असे एलॉन मस्क यांनी म्हटले आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी आयात शुल्कामध्ये कपात केली जावी अशी मागणी त्यांनी भारत सरकारकडे केली आहे. टेस्ला कंपनीला आपल्या उत्पादीत केलेल्या कार्सच्या विक्रीचा शुभारंभ याच वषी भारतामध्ये करावयाचा आहे.
खरी अडचण…..
असं जरी असलं तरी भारतामध्ये इलेक्ट्रिक कार्सच्या किमती तशा महागच आहेत व चार्जिंगच्या सुविधाही आपल्याकडे पुरेशा नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक कार्स घेण्याप्रती ग्राहकांचा कल म्हणावा तसा झुकताना दिसत नाही. मागच्या वषी 24 लाख कार्सपैकी फक्त 5 हजार इतक्मयाच इलेक्ट्रिक गाडय़ा विकल्या गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. चार्जिंग केंद्रांची संख्या अपुरी असल्यामुळे लोक कार घेण्यासाठी उत्सुक दिसत नाहीत. त्यामुळे सरकारला याबाबतीत आता पुढाकार घेऊन चार्जिंग केंद्रांची संख्या वाढवणे गरजेचे ठरणार असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.









