वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीने जाहीर केलेल्या महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत भारताची सलामीची फलंदाज शफाली वर्माने पुन्हा अग्रस्थान पटकाविले आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 1-0 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाची कर्णधार लॅ†िनंग आणि अष्टपैलू मॅकग्रा यांनाही मानांकनात बढती मिळाली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेत केवळ एक सामना खेळविला गेला. पावसामुळे इतर दोन सामने रद्द करावे लागले. ऍडलेडच्या पहिल्या सामन्यात लॅ†िनंग आणि मॅकग्रा यांनी दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 144 धावांची भागिदारी केली. या सामन्यात मॅकग्राला सामनावीर म्हणून जाहीर करण्यात आले. तिने 49 चेंडूत 91 तर लॅ†िनंगने 44 चेंडूत 64 धावा फटकावल्या. या कामगिरीमुळे लॅ†िनंगने टी-20 फलंदाजांच्या यादीत दुसऱया स्थानावर झेप घेताना भारताच्या स्मृती मानधनाला मागे टाकले. स्मृती मानधना या यादीत तिसऱया स्थानावर आहे. मॅकग्राने या यादीत 28 वे स्थान मिळविले आहे. 2020 साली महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेवेळी शफाली वर्माने मानांकनात पहिले स्थान मिळविले होते. आता पुन्हा एकदा शफाली वर्मा या मानांकन यादीत 728 गुणांसह पहिल्या स्थानावर झेपावली आहे. अष्टपैलूंच्या यादीमध्ये न्यूझीलंडची सोफी डिव्हाइन पहिल्या स्थानावर आहे.









