प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रविवारी आणखी अकरा रुग्णांची भर पडली असून कोरोनाचे निदान करण्यासाठी स्वॅब तपासणी करणाऱया आयसीएमआरच्या कर्मचाऱयाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
रविवारच्या अहवालात शनिवारी मृत्युमुखी पडलेल्या दोघा जणांचाही उल्लेख आहे. अनगोळ येथील 63 वर्षीय वृद्धेला कोरोनाची लागण झाली असून त्या वृद्धेच्या थेट संपर्कातील नऊ जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अनगोळ परिसरात खळबळ माजली आहे.
येथील आयसीएमआरच्या प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी करणाऱया हनुमाननगर येथील 35 वषीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सुभाषनगर येथील 43 वषीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. तर उगरगोळ, ता. सौंदत्ती येथील 48 वषीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
रविवारी अथणी तालुक्मयातील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. अनंतपूर येथील 35 वषीय महिला, 44 वषीय इसम व 15 वषीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विक्रमपूरसह स्थानिक अथणी येथील 52 वर्षीय महिला व 42 वषीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अकरापैकी शनिवारी मृत्यू झालेल्या दोघा जणांचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. उर्वरित नऊ जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
रविवारी पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी पाच जणांना कोणाच्या संपर्कातून कोरोनाची लागण झाली, याचा उलगडा झाला नाही. आरोग्य विभागाचे अधिकारी यासंबंधी माहिती मिळविण्याचे काम करीत आहेत. रविवारी एकूण बाधितांची संख्या 388 वर पोहोचली असून 316 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
अडीच हजार अहवालांची प्रतीक्षा
जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाला 2 हजार 431 स्वॅब तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात 74 जणांवर उपचार करण्यात येत आहेत. तर 9 हजार 481 जणांना चौदा दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्हय़ातील 28 हजार 956 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे.









