नवी दिल्ली
सण उत्सवाच्या काळात दुकानातील वस्तुंची विक्री वाढवण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने एक नवी योजना आणली आहे. बँकेने डिजिटल स्टोर मॅनेजमेंट प्लॅटफॉर्मची सुरूवात केली असून याअंतर्गतच्या ऑफर्सचा फायदा किराणा दुकानदारांना उठवता येणार आहे. या नव्या प्लॅटफॉर्ममार्फत किराणा दुकानदारांना बिलिंगसह पीओएस, क्युआर कोड किंवा पेमेंट लिंक्सच्या माध्यमातून मिळणाऱया रक्कमेचे व्यवस्थापन करू शकणार आहेत, असे आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे. आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून किराणा दुकानदारांना आपले दुकान ऑनलाइन स्टोअरमध्ये रुपांतरीत करता येते.









