मुंबई
आयटीसी कंपनीने आयुर्वेदिक आणि नैसर्गिक वैयक्तिक देखभाल ब्रँड मदर स्पर्श सोबत नुकताच एक करार केला असून याअंतर्गत हिस्सेदारी प्राप्त केली आहे. या कराराअंतर्गत आयटीसी 16 टक्के इतकी हिस्सेदारी खरेदी करणार आहे. समभाग खरेदीच्या माध्यमातून आयटीसीने हिस्सेदारी प्राप्त करताना 20 कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. मदर स्पर्श ही आयुर्वेदिक क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी आहे.