शेळ मेळावलीतील महिलाचा निर्धार,
वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील गुळेली पंचायत क्षेत्रातील शेळ मेळावली येथील नियोजित आयआयटी प्रकल्प आम्हाला नकोच, असा निर्धार व्यक्त करीत तेथील महिलांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून या भागातील महिला रस्त्यावर उतरून या प्रकल्पाला आपला विरोध दर्शवित आहेत. सत्तरी तालुक्मयातील यापूर्वी अनेक आंदोलने झाली मात्र आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात प्रदीर्घकाळ सुरू असेलेल हे आंदोलन ऐतिहासिक ठरत आहे.
सरकारने मात्र या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. तालुक्मयातील शेळ मेळावली याठिकाणी साडेतीन हजार कोटी खर्च करून आयआयटी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 13 लाख चौरस मीटर जमीन संपादित करण्यात येणार आहे. पैकी दहा लाख चौरस मीटर जमीन सरकारने संपादित केली असून ती आयआयटी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाकडे देण्यात आलेला आहे. उर्वरित तीन लाख चौरस मीटर जमीन येणाऱया काळात आयआयटी व्यवस्थापनाला सुपूर्द करण्यात येणार असल्याचे समजते. हा प्रकल्प साकार झाल्यास तेथील शेती व बगायची बगायतीवर संक्रांत येणार असून त्यामुळे तेथील शेतकरी अडचणीत येणार आहेत. यामुळे या ठिकाणी हा प्रकल्प होऊ नये, अशी मागणी सुरुवातीपासूनच या भागातील नागरिकांनी लावून धरली आहे. यासाठी अनेक स्तरावर आंदोलने व्करण्यात आलेली आहे. मध्यंतरी सरकारने या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचे मोजमापन सुरू केले होते. तेव्हापासून या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन आक्रमक करण्यात आले.
दररोज 200 महिला करत आहेत आंदोलन
आंदोलकांची आक्रमकता पाहून सरकारने मोजमापनाचे काम बंद केले. गेल्या दोन महिन्यांपासून हे काम बंद आहे. तरीसुद्धा कोणत्याही क्षणी या कामाला सुरुवात होण्याची शक्मयता असल्याने या भागातील नागरिक व खासकरून महिला या प्रकल्पाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपला सरकारच्या भूमिकेचा निषेध करत आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सातत्याने या भागातील महिला दररोज सकाळ ते दुपारपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. दरदिवशी 200 पेक्षा जास्त महिला रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शवत आहेत. सरकारने अजूनपर्यंत याची दखल घेतलेली नाही. तरीसुद्धा आम्ही आमचा निर्धार सोडणार नसून जोपर्यंत प्रकल्प स्थलांतरित होत नाही तोपर्यंत या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार आहेत, असा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
सरकारला गोव्यातील महिलांची काळजी नाही. शेळ मेळावली सारख्या ग्रामीण भागातील महिला आज एखाद्या प्रकल्पाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपले आंदोलन करीत आहे. त्याची दखल सरकार घेत नाही. सरकार या भागातील महिलांना रस्त्यावर उतरून आपला कोणता हट्ट पुरविण्याचा प्रयत्न करीत आहे ? असा प्रश्न आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केला आहे.
सत्तरी तालुक्मयात अनेक प्रकारच्या समस्या आहेत. यापूर्वी झालेल्या आंदोलनांना दिशा निर्माण झाली नव्हती. मात्र प्रकल्पाच्या विरोधात व खास करून महिलांनी ज्यापद्धतीने याला विरोध केला आहे. ते पाहिल्यास या महिलांचा निर्धार खरोखरच वाखाणण्याजोगा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सध्या सरकारची यंत्रणा या प्रकल्पाच्या संदर्भात पूर्णपणे मौनव्रत धारण करून आहे. यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोमवारपासून काम सुरू होण्याची शक्यता
दरम्यान, आयआयटी प्रकल्पाच्या कामाला सोमवारपासून सुरुवात होण्याची शक्मयता आहे. सरकारने आंदोलन प्रखर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते काम पूर्णपणे बंद केले होते. जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला तालुक्मयात यश मिळाले आहे. त्यामुळे सरकारचे मनोबल वाढले असून आयआयटी प्रकल्पाच्या कामाला आता लवकरच सुरू होणार असल्याची माहिती प्राप्त झाले आहे. त्यासंदर्भातील संपूर्ण तयारी सरकारने सुरू केल्याचे समजते.
यंत्रणा अधिक सक्रिय करण्याचा प्रयत्न
येणाऱया काळात शेळ मेळावली भागात पोलीस चौकी उभारण्याची पूर्वतयारी सरकारने सुरू केलेली आहे. या संदर्भात एक महत्त्वाची बैठक दोन दिवसांपूर्वी पणजीत झाली. या बैठकीला तालुक्मयातील प्रमुख अधिकारी अधिकारी व आयआयटी व्यवस्थापनाचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले.
राजकीय फायद्यासाठी केले होते काम बंद ? आंदोलनाचा प्रतिकूल परिणाम सत्तरी तालुक्मयातील भाजपाच्या उमेदवारावर होऊ नये यासाठी विशेष दखल घेऊन सरकारने सुरू केलेले जमिनीचे मोजमापाचे काम बंद केले होते. मात्र निवडणुकीत भाजपाने तालुक्मयातील तिन्ही मतदारसंघांमध्ये दमदारपणे विजय प्राप्त केल्यानंतर सरकारचे मनोबल आता वाढलेले आहे. यामुळे सोमवारपासून पुन्हा एकदा मोजमाप करण्याच्या कामाला प्रारंभ होणार असल्याचे समजते. यदाकदाचित सोमवारपासून जमिनीच्या मोजमापाचे काम सुरू झाल्यास आंदोलनाची दिशा आक्रमक









