प्रतिनिधी / सोलापूर
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर शहरातील मड्डीवस्ती परिसरात दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसले तरी वाहनाचे मात्र नुकसान झाले आहे. याप्रकारामुळे शहर आणि जिल्ह्यातील राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे.
ओबीसींच्या आरक्षण प्रश्नावर विविध सामाजिक संघटना तसेच ओबीसी प्रवर्गातील लोकांशी चर्चा करण्यासाठी पडळकर बुधवारी सोलापुर दौ-यावर आले होते. सकाळपासूनच त्यांनी घोंगडी बैठकांचा सपाटा लावला होता. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार पाfरषदेत खासदार शरद पवार आणि त्यांच्या घराण्यावर जहरी टिका केली होती. बुधवारी सायकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या वाहनावर दगडफेक केली. त्यामध्ये त्यांच्या वाहनाचे समोरील काचेचे नुकसान झाले आहे. याबाबत पोलिसांत अद्याप तक्रार दाखल झालेली नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









