प्रतिनिधी /पणजी
यंदाच्या निवडणुका लढवण्याच्या तयारीत असलेल्या आम आदमी पक्षाने काल रविवारी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दहा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.
दिल्लीचे आमदार आणि आम आदमी पार्टीचे गोवा डेस्क प्रभारी आतिशी यांनी ट्विट केले की, गोवा विधानसभा निवडणुका 2022 जाहीर झाल्या आहेत आणि आम आदमी पार्टी गोव्यात बदल घडवून आणण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. या राजकीय परिवर्तनाचे नेतृत्व करणाऱया उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करताना मला आनंद होत आहे. सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
पक्षाने जाहीर केलेले दहा उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ पुढीलप्रमाणे आहेत. 1) रामराव वाघ – सांतआंदे, 2) सुदेश मयेकर कळंगुट, 3) सेसिल रॉड्रिग्स ताळगाव, 4) राजेश कळंगुटकर मये, 5) प्रशांत नाईक कुंकळी, 6) राहुल म्हांबरे म्हापसा, 7) क्रूझ सिल्वा वेळी, 8) अनूप कुडतरकर काणकोण, 9) अनिल गावकर सावर्डे, 10) संदेश तेलेकर देसाई फातोर्डा









