आम आदमी पार्टीची जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी / सोलापूर
राज्यात ०६ एप्रिल २०२१ ते ३० एप्रिल २०२१ थेट २५ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. ह्यामुळे जनता, कामगार वर्ग, व्यापारी हे आर्थिक संकटात आले आहेत. कोरोना शी लढा हि प्राथमिकता असली तरी फक्त लॉकडाऊनचा आदेश काढुन जनतेला उपासमारी, भयानक आर्थिक व मानसीक अडचणी मध्ये आपण सोडु शकत नाही. त्यामुळे आधी आर्थिक पॅकेज जाहीर करा मगच खुशाल लॉकडाऊन करा अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आले.
अखंडित लॉकडाऊन ना करता अधिक कठोर अटी नियम करून सध्या काढलेले आदेश हे मागे घेऊन जनते चे दैनंदिन जीवन व आर्थिक चक्र चालू ठेवता आपण कोरोना शी लढा देऊयात. शम विषम लॉकडाऊन किंवा इतर मार्गांवर हि विचार होऊ शकतो. ह्यावेळी आम आदमी पार्टी शहर अध्यक्ष मो. अस्लम शेख, रॉबर्ट गौडर, ईलियास शेख, निहाल किरनळ्ळी, अरफात इनामदार आदी उपस्थीत होते.









