ऑक्सफोर्ड लँग्वेजेजने ‘आत्मनिर्भर भारत’ला 2020 मधील हिंदी भाषेचा सर्वात लोकप्रिय शब्द घोषित केले आहे. हा शब्द भाषातज्ञ कृतिका अग्रवाल, पूनम निगम सहाय आणि इमोगन फॉक्सेल यांच्या सल्लागार समितीद्वारे निवडण्यात आला आहे. ‘ऑक्सफोर्ड हिंदी शब्द’चे तात्पर्य अशा शब्दाशी आहे, जो मागील वर्षातील लोकांचे आचरण मनोदशा किंवा स्थिती प्रतिबिंबित करेल आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या शब्दाच्या स्वरुपात दीर्घकाळापर्यंत अस्तित्वात राहण्याची क्षमता ठेवतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महामारीला सामोरे जाताना पॅकेजची घोषणा केली असता तेव्हा त्यांनी देशाला एक अर्थव्यवस्थेच्या स्वरुपात, समाज आणि वैयक्तिक स्वरुपात आत्मनिर्भर करण्यावर भर दिला होता. त्यानंतरच ‘आत्मनिर्भर भारत’ शब्दाचा वापर भारतातील जनजीवनात प्रचंड प्रमाणात वाढला आहे. प्रजासत्ताक दिनी राजपथावर आत्मनिर्भर भारत मोहिमेला अधोरेखित करत चित्ररथही काढण्यात आला होता.
‘आत्मनिर्भर भारत’ला अनेक क्षेत्रांच्या लोकांदरम्यान ओळख मिळाली आहे, कारण याला महामारीने प्रभावित अर्थव्यवस्थेला सामोरे जाण्यासाठीचे एक अस्त्र म्हणून पाहिले गेल्याचे उद्गार ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी प्रेस इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शिवरामकृष्णन वेंटकेश्वरन यांनी काढले आहेत. 2007 साली ‘आधार’ तर 2018 मध्ये ‘नारीशक्ती’ तसेच 2019 मध्ये ‘संविधान’ला ऑक्सफोर्डने हिंदी भाषेतील शब्द निवडले हेते.









