तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशाला बसणारा भुर्दंड वाचला
प्रतिनिधी / सोलापूर
रेल्वे प्रवाशाकडे असलेले कन्फर्म तिकीट आता इतर प्रवाशांच्या नावे किंवा कुटुंबातील आपल्या सदस्यांच्या नावे ट्रान्स्फर करता येणे शक्मय होणार आहे. त्यामुळे कन्फर्म तिकीट रद्द केल्यानंतर पडणारा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागणार नाही. त्यासाठी रेल्वे कार्यालयात एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे, अशी माहिती वरि÷ विभागीय वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी दिली.
पूर्वी एखाद्याने रेल्वेचे तिकीट काढलं तर ते तिकीट इतरांना ट्रान्स्फर करणे शक्मय नव्हते. मात्र आता रेल्वे प्रशासनाने नियमात केलेल्या बदलामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. एखाद्या वेळेस अचानक उद्भवणाऱया कारणामुळे किंवा वैयक्तिक कारणामुळे प्रवास रद्द करावा लागतो. आता नव्या नियमानुसार प्रवासाच्या 24 तास आधी एक अर्ज करावा लागणार आहे. काही स्थानकावर मुख्य आरक्षण पर्यवेक्षक आला की त्यावरील नाव बदलण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
तिकीट कुटुंबातील सदस्य असणारे आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पत्नी किंवा पतीच्या नावावर करता येणार आहे. तिकीटधारक सरकारी कर्मचारी असल्यास प्रवासाच्या 24 तास आधी लेखी अर्ज करून त्याला त्याचे तिकीट दुसऱयाच्या नावे करता येईल. त्याच बरोबर लग्नाच्या वऱहाडातील मंडळींनाही आपले तिकीट इतर व्यक्तींच्या नावे करता येणार आहे.
लेखी अर्ज करावा लागेल
रेल्वेचे तिकीट कुटुंबातील इतर सदस्यांना ट्रान्स्फर करता येऊ शकते. मात्र त्या व्यक्तीला रेल्वे कार्यालयात येऊन लेखी अर्ज द्यावा लागणार आहे. त्यानंतरच तिकीट ट्रान्स्फर होऊ शकेल. – प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक









