पुणे / प्रतिनिधी :
मुसळधार पाऊस तसेच वादळादरम्यान होणाऱ्या पावसानंतर येणाऱ्या पुराचा इशारा देण्यायासाठी आय फ्लो या यंत्रणेचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत भारतीय हवामान विभाग, एन सी सी आर दिल्ली, आय आय टी एम पुणे ऐन सी एम आर यांनी मिळून हे यंत्रणा विकसित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा उपस्थितीत याचे आज अनावरण केले जाईल. उद्धव ठाकरे मंत्रालयातून विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे याचे उदघाटन करतील.