कोरोनामुक्त संख्या 460 : कोरोना सक्रिय 215 : जिल्हाधिकाऱयांची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात बुधवारी आणखी तेरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण संख्या 689 वर पोहोचली आहे. तर आणखी चार रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात आतापर्यंत एकूण 460 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत कोरोना सक्रिय रुग्ण 215 आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी येथे दिली.
बुधवारी आढळलेल्या तेरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कणकवली तालुक्मयातील वारगावमध्ये एकाच कुटुंबातील आठजण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सांगवे एक, सावंतवाडी तालुक्मयातील सावंतवाडी जुनाबाजार एक, माजगाव एक, होडावडे एक आणि वेंगुर्ले तालुक्मयातील पेंढऱयाची वाडी येथील एकाचा समावेश आहे.
कंटेनमेंट झोन
दोडामार्ग तालुक्मयातील सुरुचीवाडी लक्ष्मी नारायण बिल्डिंगमधील घर क्र. 817 चा परिसर हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 30 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तसेच सावंतवाडी तालुक्मयातील माजगाव-ख्रिश्चनवाडा नवजीवन सोसायटीचा बारा मीटरचा परिसर 1 सप्टेंबर रोजी रात्री 12 पर्यंत, तर चराठे-खरवतटेंबचा 24 मीटरचा परिसर 31 ऑगस्ट रोजी रात्री 12 पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 10365
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 689
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 9410
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 266
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 215
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 14
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 460
अलगीकरणातील एकूण व्यक्ती 21279
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4142
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 199229
सद्यस्थितीत सक्रिय कंटेनमेंट झोन 82









