सकाळी 10 पासून सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान, सायंकाळी 6 नंतर होणार मतमोजणी
प्रतिनिधी /बेळगाव
अत्यंत प्रतिष्ठेची म्हणून बार असोसिएशनच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. आज मतदान असून मतमोजणीही शनिवार दि. 20 रोजी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे साऱयांच्याच नजरा लागल्या असून बार असोसिएशनचा पुढील अध्यक्ष कोण? हे आज स्पष्ट होणार आहे.
गेल्या दहा दिवसांपासून निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. अध्यक्षपदासाठी ऍड. डी. एम. पाटील आणि ऍड. प्रभू यतनट्टी निवडणूक लढवत आहेत. या दोघांमध्ये थेट लढत असून कोण बाजी मारणार, हे आता शनिवारी समजणार आहे. उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी 7 जण रिंगणात आहेत. ऍड. लक्ष्मण पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. सचिन शिवण्णावर, ऍड. व्ही. आर. कमते, ऍड. अमित कोकितकर, ऍड. बसवराज एम. मुगळी, ऍड. विनोद एस. पाटील यांच्यात लढत होत आहे.
जनरल सेपेटरी पदासाठी एकूण सहा जण निवडणूक लढवत आहेत. यामध्ये ऍड. सतीश गोपाळ बिरादार, ऍड. शिवलिंगाप्पा बुदीहाळ, ऍड. वाय. के. दिवटे, ऍड. रविंद्र गुंजाळे, ऍड. षडाक्षरी हिरेमठ, ऍड. गिरीश पाटील यांच्यात लढत होणार आहे. जॉईंट सेपेटरी पदासाठी एकूण चार जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये ऍड. बंटी कफाई, ऍड. श्रीधर कुलकर्णी, ऍड. निंगनगौडा पाटील, ऍड. विश्वनाथ सुलतानपुरी यांच्यात लढत होत आहे.
कमिटी सदस्य पदाच्या पाच जागांसाठी 13 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. ऍड. मुरलीधर भस्मे, ऍड. आय. वाय. बयाळ, ऍड. आनंद घोरपडे, ऍड. येशुनाथ गुट्टेण्णावर, ऍड. चंद्रशेखर हिरेमठ, ऍड. रमेश मोदगेकर, ऍड. सुरेश नागनुरी, ऍड. आदर्श पाटील, ऍड. महांतेश पाटील, ऍड. राकेश निंगनगौडा पाटील, ऍड. पी. के. पवार, ऍड. अभिषेक उदोसी, ऍड. विठ्ठल हुपरी हे रिंगणात आहेत. महिला प्रतिनिधीसाठी ऍड. शकुंतला कांबळे, ऍड. पूजा पाटील यांच्यात लढत रंगणार आहे.
सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. सायंकाळी 6 पासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. साधारण 8 च्या दरम्यान निकाल बाहेर पडण्यास सुरुवात होईल. प्रारंभी कमिटी आणि इतर पदांची मतमोजणी होईल. त्यानंतर अध्यक्षपदाच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी होण्याची शक्मयता आहे. मतदान करण्यासाठी वकिलांना आवाहन केले आहे. वकील समुदाय भवनमध्ये सर्व तयारी केली आहे.
मतदान-मतमोजणीची तयारी पूर्ण…
या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून ऍड. संजय बी. तुबाची यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आतापर्यंत अत्यंत काळजीपूर्वक सर्व कामकाज हाताळले आहे. शनिवार दि. 20 रोजी निवडणूक असल्याने त्यांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे. निवडणुकीसाठी एकूण 40 मतदान केंदे तयार केली आहेत. महत्त्वाचे म्हणजे दिव्यांग आणि ज्येष्ट वकिलांसाठी एक स्वतंत्र मतदान केंद्र तयार केल्याची माहिती निवडणूक अधिकारी ऍड. संजय बी. तुबाची यांनी दिली.









