मेष: देव पितृकार्यात भाग घ्याल, सुखप्राप्ती, धनलाभ, संततीलाभ.
वृषभः नको त्या पथ्यामागे लागल्याने शारीरिक त्रास जाणवेल.
मिथुन: आर्थिक अडचणींना वाव देऊ नका, संचय करण्यास शिका.
कर्क: फोनवरून तिऱहाईताशी बोलताना काळजी घ्या.
सिंह: अन्न, वस्त्र या बाबतीत नवे धोरण आखाल.
कन्या: जुने वाहन अथवा जुने अलंकार खरेदी करण्याची संधी.
तुळ: तुमच्या भक्कम आधारामुळे भावंडांवरील संकट टळेल.
वृश्चिक: महत्त्वाच्या बाबींची कुठेही वाच्यता करू नका.
धनु: योग्य व्यक्ती असेल तरच मदत करा अन्यथा अडचणीत याल.
मकर: इतरांच्या नजरेत भरेल असा डामडौल शक्यतो करू नका.
कुंभ: धनसंग्रह कराल, कामासाठी योग्य नोकरचाकर मिळतील.
मीन: काही गोष्टीत अतिरेक हानीकारक ठरू शकेल.





