प्रतिनिधी / आचरा:
सध्याच्या महामारीचा, विविध क्षेत्रातील उद्योग व अर्थकारणावर बऱयापैकी प्रभाव आपण अनुभवत आहे. जे विद्यार्थी दहावी, बारावीनंतर शिक्षण सोडून व काही पदवी घेऊनही गावातच बेरोजगारीला सामोरे जात आहेत. अशा गरजूंना आत्मनिर्भरतेने स्वयंरोजगार मिळण्याच्यादृष्टीने तंत्र व कौशल्य विकास पायाभूत ठेवून ग्रामक्षेत्रातील मूलभूत सुविधांचा विचार करून सक्षम रोजगार व अर्थकारणाचा विकास करण्याच्यादृष्टीने धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित ‘शिवराम उर्फ दाजी गुळगुळे तंत्र व कौशल्य विकास केंद्र’ आचरा येथील न्यू इंग्लिश स्कूल संस्थेच्या कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आले. या केंद्राचा शुभारंभ आचरा गावचे ज्ये÷ सुपुत्र रमाकांत गुळेगुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी ज्या कुटुंबाच्या दातृत्वाने हे केंद्र सुरू झाले, त्या कुटुंबाचे सदस्य राजन गुळेगुळे, सुनीता गुळेगुळे, कुंदा शिरवलकर, अनिष गुळेगुळे, नेहा गुळेगुळे, उदय गुळेगुळे, माधवी गुळेगुळे, सई गुळेगुळे, यांच्यासमवेत न्यू इंग्लिश स्कूल कमिटी चेअरमन नीलिमा सावंत, इंग्लिश मीडियम चेअरमन नीलेश सरजोशी, सर्व कमिटी सदस्य शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग यावेळी हजर होते. सुरू करण्यात आलेल्या उपक्रमात सध्या प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ तंत्रज्ञानांचे मार्गदर्शन देण्यात येत आहे. त्यासाठी राजन गुळेगुळे व गुळेगुळे कुटुंबीय यांच्या सहकार्याने दि आचरा पिपल्स असोसिएशन मुंबई यांच्या सेमी माध्यम (न्यू इंग्लिश स्कूल) स्थानिय कमिटी, नामदेव शंकर कावले इंग्लिश माध्यम स्थानिय कमिटी, आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज स्थानिय कमिटी, यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर उपक्रमांतर्गत इलेक्ट्रीकल टेडमध्ये एसी रिपेरिंग, सेंट्री फंगल पंप रिपेअरिंग, घरगुती रेफ्रिजरेटर रिपेअरिंग, मिक्सर ग्राइंडर रिपेअरिंग, ट्रान्सफॉर्मर आणि मोटारवायरिंग, गॅसलाईन पॉवर जनरेटर, इंडस्ट्रियल वायरिंग इन्स्टॉलेश, घरगुती वायरिंग इन्स्टोलेशन, इलेक्ट्रॉनिक टेडमध्ये मायक्रो ओव्हन रिपेरिंग, वॉशिंग मशिन रिपेरिंग, (कॉम्पुटर) युपीएस रिपेरिंग, तर ऑटोमोबाईल टेडमध्ये मोटर सायकल रिपेरिंग चे प्रशिक्षण लवकरच सुरू करण्याचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.









