वेलिंग्टन
आओटेरोआ….वाचून अनेकांना हे आणि काय असं नक्कीच वाटेल. पण या नावाने आता एका जुन्या देशाची नव्याने ओळख होणार आहे. त्याबाबत आता उत्सुकता वाढीस लागली आहे. न्यूझीलंड या देशाचे नाव वरीलप्रमाणे करण्यासाठी तेथील माओरी पक्षाने आग्रह धरला असल्याचे समजते. खुद्द न्यूझीलंडमध्येच आओटेरोआ या नव्या नावावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत. देशातील माओरी पक्षाने 14 सप्टेंबरला न्यूझीलंडचे नाव बदलून आओटेरोआ करण्याविषयीची याचिका दाखल केली असल्याचे समजते. सदरच्या नावाचा स्थानिक भाषेतील अर्थ लांब पांढऱया ढगांची भूमी असा होतो. माओरी पक्षाने पंतप्रधान जेसींडा अर्डन यांना न्यूझीलंडमधील सर्व नगरे, शहरे आणि ठिकाणांचे नामकरण माओरीत बदलण्याचीही मागणी केली आहे. ते री माओरी ही देशाची पहिली आणि अधिकृत भाषा राहिलेली आहे. देशातील नागरिक याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नाराज आहेत. तेव्हा 21 व्या शतकात नावात बदल करण्याची खरी गरज असल्याचे माओरी पक्षाने म्हटले आहे. मागणी मान्य होते का हे आगामी काळात स्पष्ट होईल.









