वडोदरात महिला पोलिसांच्या मुलांसाठी विशेष सुविधा
पोलीस स्थानकात चाइल्ड प्रेंडली कॉर्नर स्थापन
विविध शहरांमध्ये पोलीस विभागात कार्यरत महिला पोलिसांच्या मुलांना सुविधा देण्यासाठी पोलीस स्थानकात चाइल्ड प्रेंडली कॉर्नर तयार केले जात आहेत. एका विशेष योजनेच्या अंतर्गत पोलीस विभागाने हा प्रकल्प हाती घेतला ओह. अशाप्रकारच्या चाइल्ड प्रेंडली कॉर्नरची सुरुवात 19 मार्चपासून वडोदरातही झाली आहे. याचे उद्गार पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी केले आहे.
प्रत्येक पोलीस स्थानकात 30 टक्के महिला कर्मचारी आहेत. यातील बहुतांश महिलांना छोटी मुले आहेत. सर्वसाधारणपणे या महिला पोलीस दीर्घवेळेपर्यंत पोलीस स्थानकातच असतात. अशा स्थितीत कार्यरत असतानाही मुलांची देखभाल झाल्यास त्या अधिक चांगल्याप्रकारे सेवा बजावू शकतात. या चाइल्ड प्रेंडली कॉर्नरमध्ये मुलांसाठी रंगबिरंगी सेटअप करण्यात आला आहे. तसेच खेळणी आणि अन्य आकर्षक व्यवस्थाही पुरविण्यात आली आहे.