वार्ताहर / हिंडलगा
आंबेवाडी येथील श्रीराम युवक संघटनेतर्फे आयोजित मोटारसायकलसोबत म्हैस पळविण्याच्या शर्यतीत मोठय़ा गटात मंडोळी येथील सागर नंद्याळकर तर लहान गटात कॅम्प येथील उमेश कसोटी यांच्या म्हशीने प्रथम क्रमांक पटकाविला. शर्यतीत सुमारे 80 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
प्रारंभी मराठा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. भाजपा ग्रामीण माजी अध्यक्ष विनय कदम यांनी श्रीफळ वाढविले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. स्पर्धेचे उद्घाटन विनय कदम, भाजप नेते पृथ्वी सिंग, सुनील जाधव यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी हिंडलगा ग्राम पंचायत सदस्य व माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ग्राम पंचायत सदस्य यल्लोजीराव पाटील, मराठा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष जोतिबा दौलतकर, ग्राम पंचायत सदस्य अर्जुन राक्षे, लक्ष्मण चोपडे, दशरथ कोलते, विकास भातकांडे, पी. के. तरळे, शशी तुडयेकर, मल्लाप्पा सांबरेकर, सचिन शहापूरकर, तानाजी भातकांडे, नेमाणी मजुकर, मंडळाचे अध्यक्ष राहुल भातकांडे यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील गवळी बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित
होते.
शर्यतीमधील विजेते पुढीलप्रमाणे-
मोठा गट- प्रथम सागर नंद्याळकर (मंडोळी), द्वितीय राहुल चव्हाण (कंग्राळी), तृतीय राकेश बादरे (कंग्राळ गल्ली), चौथा काळभैरव प्रसन्न (चव्हाट गल्ली), पाचवा धामणेकर (गणेशपूर), सहावा दुर्वा कोकितकर (हिंडलगा), सातवा अरुण गवळी (शिनोळी), आठवा प्रवीण भातकांडे (हिंडलगा), नववा केतन भातकांडे (रुक्मिणीनगर), दहावा आरव गवळी (तुरमुरी), अकरावा प्रकाश नेवगिरी (विनायकनगर).
लहान गट- प्रथम उमेश कसोटी (कॅम्प), द्वितीय प्रमोद केसरकर (रुक्मिणीनगर), तृतीय श्री मंगाई देवी प्रसन्न (वडगाव), चौथा अभिजीत पाटील (कंग्राळी), पाचवा केदार शांताराम तवनोजी (गांधीनगर), सहावा कुशल गावडे (कॅम्प), सातवा नेताजी पाटील, आठवा निधी भांदुर्गे (शहापूर), नववा विश्वनाथ तवनोजी (गांधीनगर), दहावा श्री सिद्धेश्वर प्रसन्न (काकती), अकरावा जगदीश हरिजन (काकती), बारावा मळेकरणी प्रसन्न (उचगाव).