मुंबई
व्यावसायिक वाहन निर्माती कंपनी अशोक लेलँड लवकरच बांगलादेशला 200 ट्रक्सचा ऑर्डरअंतर्गत पुरवठा करणार असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 2 अब्ज डॉलर्सच्या कर्ज मदतीअंतर्गत सदरचा ट्रक्सचा पुरवठा केला जाणार आहे. अशोक लेलँडने यापैकी 135 ट्रक्सचा पुरवठा याआधीच केला आहे. यामध्ये 3 टी ट्रक, हायड्रॉलिक बीम लिफ्टर आणि सीवरेज सॉकर यांचा समावेश आहे.









