सातारा / प्रतिनिधी :
मौजे कोडोली, देगाव फाटा परिसरात आंबा, अशोक, भोकर झाडांची अवैधरित्या तोड करून ट्रॅक्टर व टेम्पोच्या सहाय्याने विनापरवाना वाहतूक करीत असताना वनविभागाने 2 जणांना पकडले. याप्रकरणी एमएच 9 ए 7583 व ट्रक्टर क्रमांक एमएच 13 टी 8440 अशी दोन वाहने लाकूडमालासह जप्त करून पुढील तपासाकामी वनरोपवाटिका गोडोली येथे आणून ठेवण्यात आली आहेत.
याअंतर्गत जयवंत रामचंद्र वाघमळे व शंकर रामचंद्र वाघमळे दोघेही रा. कण्हेर असे दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत. सदरची कारवाई उपवनसंरक्षक सातारा महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक सातारा सुधीर सोनवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सातारा निवृत्ती चव्हाण, वनपाल परळी प्रशांतकुमार पडवळ, वनरक्षक सातारा सुहास भोसले यांनी केली.









