‘पुष्पा’ टीमच्या प्रत्येक सदस्याला सोन्याची अंगठी गिफ्ट
दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन सध्या ‘पुष्पा’ या चित्रपटावरून चर्चेत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेला चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर गाजतोय. चाहत्यांपासून दिग्गज कलाकार अल्लूचे कौतुक करत आहेत. आता अल्लू अर्जुनच्या एका कृत्यामुळे त्याच्या चित्रपटाच्या टीमसह चाहतेही त्याची प्रचंड प्रशंसा करत आहेत.
अल्लू अर्जुनने ‘पुष्पा’ चित्रपटाच्या टीममधील प्रत्येक सदस्याला सोन्याची अंगठी गिफ्ट केली आहे. चित्रपटाचे चित्रिकरण अत्यंत सहजपणे पूर्ण झाल्याने अल्लू यांना आनंद झाला होता. ‘पुष्प’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ‘पुष्पा ः द राइज’ 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल. तर दुसरा भाग पुढील वर्षी झळकणार आहे. हा चित्रपट तेलगूसह मल्याळी, तमिळ, कन्नड आणि हिंदी भाषेत पहायला मिळणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना नायिका म्हणून दिसून येणार आहे.









