अंजुमन-ए-इस्लामचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
अद्याप कोरोनाचे संकट टळले नाही. त्यामुळे नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. अल्पसंख्याक समाजाला लस देण्यासाठी अंजुमन-ए-इस्लामने सुविधा उपलब्ध केली आहे. त्याकरिता नागरिकांनी आधारकार्डसह नाव नोंदणी करण्याचे आवाहन अंजुमन-ए-इस्लामच्यावतीने करण्यात आले आहे.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. पण सध्या कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने अनलॉक करण्यात आले आहे. मात्र, कोरोना संकट कायम आहे. त्यामुळे आरोग्य खात्याच्यावतीने लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या शहराच्या विविध भागात आणि आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, लस घेण्याकडे अल्पसंख्याक समाजातील कुटुंबांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अंजुमन-ए-इस्लामच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन अंजुमन-ए-इस्लाम केंद्रात लस देण्याची सुविधा उपलब्ध करण्याची विनंती अध्यक्ष असिफ सेठ यांनी केली आहे. यामुळे याबाबत जिल्हाधिकाऱयांनी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. 18 वर्षावरील सर्वांना लस देण्यात येणार असून याकरिता आधारकार्डसह नाव नोंदणी करण्याचे आवाहन अंजुमन-ए-इस्लामचे अध्यक्ष असिफ सेठ यांनी केले आहे.









