सवलतीमुळे ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद
हँगजू : चीनची दिग्गज ई कॉमर्स कंपनी अलिबाबा हिचा मेगा शॉपिंग फेस्टिव्हल तेजीत राहिला आहे. यामध्ये कंपनीच्या एक दिवसांच्या मेगा शॉपिंगमध्ये जवळपास 56 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकची ऑर्डर प्राप्त झाली आहे. कोविड19 च्या संकटानंतर कंपनीचा हा पहिला सिंगल सेल आहे. यासोबतच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने विशेष सवलत योजना सुरु केली आहे.
अलिबाबाची फायनान्शिअल टेक्नॉलॉजी कंपनी अँट गुपच्या लिस्टिंगला चीन सरकारने रद्द केले होते. यामुळे अलिबाबाचे बाजारमूल्य 76 अब्ज डॉलरने कमी झाले आहे. अलिबाबाच्या मेगा सेलची विक्री ही चीनमधील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याने तेजीत राहिली आहे. याचा लाभ येत्या काळात अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी निश्चितपणे होणार असल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
सेलचा प्रारंभ
अलिबाबाने आपल्या चालू वर्षातील ऑनलाईन सेलचा प्रारंभ 1 नोव्हेंबर रोजी केला आहे.
20 लाख नवीन उत्पादने बाजारात
चालू स्थितीत कंपनी जवळपास 20 लाखापेक्षा अधिकची नवीन उत्पादने बाजारात उतरवणार असल्याची माहिती आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट स्थितीत राहणार असल्याचे संकेत आहेत.