कोरोनामुळे विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न : घराचे स्वप्न पाहणाऱयांना दिलासा देण्याचे उद्दिष्ट
प्रतिनिधी / बेळगाव
आयकराबाबत कोणत्याही ठोस तरतुदी नाहीत – अविनाश दीक्षित (चार्टर्ड अकौंटंट)

विविध राज्यांमधील निवडणुका डोळय़ासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचे दिसून येत आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत, अशा राज्यांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. आयकराबाबत ठोस तरतुदी कोणत्याही नाहीत. यामुळे अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून असणाऱयांच्या पदरी काहीशी निराशा आहे. जे÷ नागरिकांना काही प्रमाणात खूष करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. परंतु एकूण सध्याची अर्थव्यवस्था पाहता ती सुधारण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मध्यमवर्गियांची निराशा – सतीश तेंडोलकर (अध्यक्ष, सिटीझन्स फोरम)

कोरोनानंतर विस्कटलेली आर्थिक घडी व्यवस्थित करण्यासाठीचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. मागील वषी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे त्याच तरतुदी पुन्हा नव्या स्वरुपात सरकारने यावषी आणल्या आहेत. तसे पाहिल्यास मध्यमवर्गियांची निराशा झाली आहे. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु तशा तरतुदी दिसल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.
बचत खात्यावरील व्याजदर कमी केल्यामुळे फटका – घनश्याम जोशी (चार्टर्ड अकौंटंट)

सरकारने इन्कम स्लॅब रेट वाढविणे गरजेचे होते. बहुतेक नागरिक व्याजावर आपली उपजीविका करतात. मात्र, सरकारने बचत खात्यावरील व्याजदर कमी केल्यामुळे त्यांना फटका बसला आहे. या व्याजदर संदर्भात सरकारने काही निर्णय घ्यायला हवे होते. महागाई कमी करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे होते. मूलभूत सुविधांवरही या अर्थसंकल्पात प्रकाश टाकायला हवा होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
काही जणांसाठी आशावादी तर काहींसाठी निराशावादी – सुजित मुळगुंद (सामाजिक कार्यकर्ते)

अर्थसंकल्पातून महागाई कमी होईल, असा विश्वास सर्वसामान्यांना होता. परंतु तशी ठोस तरतूद त्यामध्ये नसल्याने निराशा झाली. काही जणांसाठी आशावादी व काहींसाठी निराशावादी असा हा अर्थसंकल्प आहे. पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्मयात राहतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. परंतु कर वाढविल्याने महागाई वाढण्याची शक्मयता आहे. शेतकऱयांची या अर्थसंकल्पातून पूर्णपणे निराशा करण्यात आली आहे. घराचे स्वप्न पाहणाऱयांना लोखंडाचे दर कमी करून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दूरगामी परिणाम करणारा अर्थसंकल्प – श्रीनिवास देशपांडे (उद्योजक)

कोरोनानंतर अर्थव्यवस्था कोलमडलेल्या स्थितीत होती. यातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. हा दूरगामी परिणाम करणारा अर्थसंकल्प ठरणार आहे. रेल्वेमध्ये मोठी गुंतवणूक केल्यामुळे उद्योगांना गती मिळणार आहे. कर्ज तारणामध्ये लघु उद्योजकांना काही प्रमाणात सवलत दिल्यामुळे व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
सर्वोत्तम अर्थसंकल्प -जितेश कब्बूर (कर सल्लागार)

यावषीचा कोरोनासारख्या महाभयंकर साथीच्या रोगामध्येही सर्वोत्तम अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. 75 वर्षांवरील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी खरेदी-विक्रीची बिले 6 वर्षांपर्यंत सांभाळून ठेवावी लागत होती. परंतु नव्या तरतुदींमुळे आता केवळ 3 वर्षे या सर्व नोंदी ठेवाव्या लागणार असल्याने व्यावसायिकांच्यादृष्टीने महत्त्वाची बाब ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गरीब व सर्वसामान्यांना आशादायी – प्रा.जी.के.खडबडी (निवृत्त प्राचार्य)

सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प गरीब व सर्वसामान्यांना आशादायी ठरला आहे. शेतकऱयांना आत्मनिर्भर करण्यासाठी, त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी हा उत्तम अर्थसंकल्प आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असतानाही सर्वांचा विचार यात केला आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करणे, प्रदूषण रोखण्यासाठीच्या तरतुदी केल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक उद्योजक, उत्पादक आत्मनिर्भर होतील
अर्थमंत्र्यांनी सादर केलेला हा उत्तम अर्थसंकल्प – मनोज हुईलगोळ-चार्टर्ड अकौंटंट

कोविडच्या पार्श्वभूमिवर अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा उत्तम आहे, असेच म्हणावे लागेल. नवीन कोणतेही कर लादण्यात आलेले नाहीत. आत्मनिर्भर योजनेला अधिक गती मिळणार आहे. व्यावसायिकांना सुलभपणे व्यवसाय करता येईल. कस्टम डय़ुटी वाढविल्याने आयात करण्यावर काही अंशी निर्बंध येईल आणि स्थानिक उत्पादकांना वाव मिळाल्याने स्थानिक उद्योजक, उत्पादक आत्मनिर्भर होतील.
जुने, काळाशी सुसंगत नसलेले कायदे रद्दबातल ठरविण्यात येत आहेत, ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. करारासंदर्भात एखादे प्रकरण पुन्हा तपासण्यासाठी सहा वर्षांची मुदत कमी करून 3 वर्षे करण्यात आली आहे, ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले आहे. प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेचा विचार करून रेल्वे वाहतुकीला अधिक वाव मिळणार आहे. या अर्थसंकल्पाने बाजारपेठेला नवचैतन्य प्राप्त होईल. त्यामुळे मार्केटमध्ये गंगाजळी निर्माण होईल. त्यामुळे हा अर्थसंकल्प समाधानकारक आहे.
रस्ते, रेल्वे, हवाई वाहतुकीला गती- सतीश मेहता-अध्यक्ष, चार्टर्ड अकौंटंट्स संस्था

कोरोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर हा अर्थसंकल्प उत्तम आहे, असेच म्हणावे लागेल. नवीन कोणतेही कर लादण्यात आलेले नाहीत. संपत्ती कर लादला जाईल, अशी भीती होती, ती निराधार ठरली आहे. संरचना क्षेत्रावर भर देण्यात आल्याने रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, मेट्रो यांना गती मिळणार आहे. बँकांचे विलीनीकरण करण्यात येणार असल्याने सेवा उत्तम मिळेल, त्यांचा दर्जा वाढेल. या अर्थसंकल्पामुळे पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि एकूणच अर्थव्यवस्था गतिमान होईल. खासगी वाहने 20 वर्षांनंतर आणि अन्य वाहने 15 वर्षांनंतर मोडीत काढणे हा निर्णय योग्य आहे. ज्यामुळे प्रदूषणाला आळा बसेल.
अर्थसंकल्प महिलांच्यादृष्टीने पोषक -वंदना पुराणिक-संस्थापिका, उन्नती संस्था
अर्थसंकल्पाबाबत आपण समाधानी आहोत. हा अर्थसंकल्प महिलांच्यादृष्टीने पोषक आहे. संपूर्ण देशभरात प्रत्येक कुटुंबाला वीज, गॅस कनेक्शन आणि पाणी सुविधा उपलब्ध होणार आहे. संरचना वाढविल्याने अनेकांना रोजगार मिळणार आहे. वैद्यकीय सुविधा आणि आरोग्य सुविधेवर या अर्थसंकल्पात अधिक भर देण्यात आल्याने सामान्य जनतेला त्याचा लाभ होणार आहे. नाबार्डअंतर्गत प्रत्येक शेतकऱयांना त्याचा फायदा होणार आहे. 150 मिलीटरी स्कूलची स्थापना ही तरुणाईसाठी स्वागतार्ह ठरणार आहे. ज्ये÷ नागरिकांना निवृत्ती वेतनावरील कर भरावा लागणार नाही. त्यामुळे एकूण हा अर्थसंकल्प समतोल आहे.
अर्थसंकल्प समतोल -राजकुमार खोडा-संचालक, मंगलदीप

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सादर झालेला हा अर्थसंकल्प समतोल आहे. आरोग्य सेवेला या अर्थसंकल्पात महत्त्व देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला लाभ होणार आहे. सोने आणि चांदीवरील सेवा कर रद्द झाल्याने त्यांचे दर खाली येतील. सर्वसामान्य नागरिकांना दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याज घेतले जाणार नाही, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प समाधानकारक आहे.









