ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी केंदीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर अर्थसंकल्प घेऊन अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत पोहोचतील. सकाळी 11 वाजता त्यांच्या अर्थसंकल्पाच्या भाषणाला सुरुवात होणार आहे.
अर्थमंत्र्यांचा टॅबमधून कुठल्या क्षेत्रासाठी काय तरतूद असणार आहे हे पाहावं लागणार आहे. सकारच्या दुसऱया कार्यकाळातील हा तिसरा अर्थसंकल्प असून सितारामन यांचा अर्थमंत्री म्हणून चौथा अर्थसंकल्प असणार आहे. कोरोनाचे संकट दोन वर्षांपासून ओढावलं असून, अशा परिस्थितीत देशासह जागतिक अर्थव्यवस्थेसमोर यातून सावरण्याचे आव्हान आहे. अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यासाठी या अर्थसंकल्पात काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सितारमण यंदाच्या अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारत अभियानाला प्राधान्य देण्याची शक्मयता आहे. नोकरदार, उद्योजक, शेतकरी आणि आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्प कसा राहणार हे पाहावे लागणार आहे.