वार्ताहर / अथणी :
तावशी (ता. अथणी) येथील प्राथमिक कन्नड शाळा सनदी मळा या शाळेचे मुख्याध्यापक अरुण जाधव यांना राष्ट्रीय समाज कल्याण सेवा संस्था-बेळगाव यांच्यावतीने राज्य पातळीवरील समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम गोकाक येथे पार पडला. जाधव यांनी, स्वतःच्या पगारातून शाळेच्या बांधकामासाठी तसेच गरीब मुलांच्या शैक्षणिक खर्चास मदत करतात. त्यांनी केलेल्या सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी बीईओ कार्यालय अथणी अधिकारी एस. एस. सनदी, एसडीएमसी पदाधिकारी उपस्थित होते.









