ऑनलाईन टीम / अयोध्या :
अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयांचे दान जमा झाले आहे. अजूनही पैशांची मोजणी सुरू असून, बँकेत काही चेक क्लियर होणे बाकी आहे. त्यामुळे दान स्वरुपातील हा आकडा वाढू शकतो. अयोध्येतील विश्वस्त कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी एका इंग्रजी दैनिकाला यासंदर्भात माहिती दिली आहे.
गुप्ता म्हणाले, राम मंदिराच्या निर्माणासाठी राम मंदिर निधी समर्पण मोहिम 15 जानेवारीपासून राबविण्यात येत होती. शनिवारी ही मोहिम पूर्ण झाली. मात्र, अजूनही कोणाला राम मंदिरासाठी दान द्यायचे असेल तर ते स्थानिक स्वयंसेवकांच्या टीमशी संपर्क साधू शकतात. मंदिरासाठी दान उभे करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्वयंसेवकांच्या टीमने 5 लाख गावांचा दौरा केला होता. त्याद्वारे मिळालेले दान राम मंदिर ट्रस्टच्या विविध बँक खात्यात जमा करण्यात आले.
स्वयंसेवकांच्या या टीमकडेच राम मंदिर बांधण्याचे काम आहे. सध्या मंदिराच्या पायाभरणीसाठी खोदकामाचे काम सुरू असून, येत्या 15 दिवसात मंदिराची पायाभरणी होणार आहे