ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने H-1B व्हिसाची नवीन नियमावली जारी केली आहे. नवीन नियमावलीनुसार कंपन्यांना अमेरिकी कामगारांचे हित प्राधान्याने लक्षात घ्यावे लागणार आहे. त्यानंतर परदेशी कर्मचाऱ्यांचा विचार करावा लागणार आहे
अमेरिका दरवर्षी 85 हजार परदेशी लोकांना आपल्या देशात नोकरी अथवा व्यवसाय करण्यास परवानगी देते. यामुळे अमेरिकेतील 5 लाख युवकांचे रोजगार हिरावले गेल्याचा ट्रम्प प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे ही संख्या 1/3 ने घटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
फेडरल न्यायालयाने मागील आठवड्यात H-1B व्हिसावरील निर्बंध हटवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर ट्रम्प सरकारकडून अधिक निर्बंध लादणारे नियम जाहीर करण्यात आले आहेत. व्हिसाचे नवीन नियम जाहीर करण्यात आलेले नाहीत. मात्र, अमेरिकन कर्मचाऱ्यांना प्रथम संधी द्यावी लागणार असल्याचे होमलँड सिक्युरिटी सचिव चाड वॉल्फ यांनी म्हटले आहे.









