वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेत इदाहो येथे दोन छोटय़ा विमानांची हवेत धडक झाल्याची घटना सोमवारी घडली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजून 20 मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दुर्घटनेवेळी दोन्ही विमाने एका जलाशयावर असल्यामुळे धडक बसताच ती पाण्यात कोसळली. विमाने बुडण्यापूर्वी दोन मृतदेह हाती लागले होते. घटनेची माहिती मिळताच मदत व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान विमानातील इतरांचाही मृत्यू झाला असल्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट न झाल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.









