ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 2 कोटींच्या उंबरठ्यावर आहे. या देशात आतापर्यंत 1 कोटी 99 लाख 77 हजार 804 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 3 लाख 46 हजार 679 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत मंगळवारी 1 लाख 94 हजार 860 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 3398 जणांचा मृत्यू झाला. 01.99 कोटी कोरोना रूग्णांपैकी 1 कोटी 18 लाख 44 हजार 472 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 77 लाख 86 हजार 653 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 29 हजार 132 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 25 कोटी 01 लाख 72 हजार 246 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कॅलिफोर्नियामध्ये कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त आहे. तिथे 22 लाख 34 हजार 765 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 24 हजार 733 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमध्ये 17 लाख 39 हजार 416 जणांना बाधा झाली असून, 27 हजार 584 रुग्ण दगावले आहेत.









