ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या संख्येने 65 लाखांचा टप्पा गाठला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 65 लाख 14 हजार 231 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 94 हजार 032 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत मंगळवारी 28 हजार 561 जणांना कोरोनाची बाधा झाली. तर 498 जणांचा मृत्यू झाला आहे. 65 लाख कोरोना रूग्णांपैकी 37 लाख 96 लाख 760 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 25 लाख 23 हजार 439 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 14 हजार 464 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 8 कोटी 86 लाख 56 हजार 974 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, अमेरिकेनंतर भारतात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. भारतात 43 लाख 67 हजार 436 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 33 लाख 96 हजार 027 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 8 लाख 97 हजार 486 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 73 हजार 923 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









