ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, तेथील कोरोनाबळींची संख्या आता 74 हजार 799 वर पोहचली आहे. मागील 24 तासात अमेरिकेत 2528 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती वल्डोमीटर या संकेतस्थळाने दिली आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिका मात्र, अद्यापही कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 12 लाख 63 हजार 092 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 74 हजार 799 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 लाख 12 हजार 991 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही अमेरिकेत 9 लाख 75 हजार 312 ॲक्टिव केसेस आहेत. त्यामधील 15 हजार 827 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कॅलिफोर्निया येथे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर अमेरिकेतील 74 हजार 799 मृतांपैकी एक तृतीयांश मृत्यू हे न्यूयॉर्क शहरातील आहेत.









