ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :
अमेरिकेत मागील 24 तासात 23 हजार 488 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1218 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 15 लाख 07 हजार 773 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 90 हजार 113 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. कोरोनाला रोखण्यात अद्यापही अमेरिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. 15.07 लाख कोरोना रूग्णांपैकी 3 लाख 39 हजार 332 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 10 लाख 78 हजार 428 ॲक्टिव केसेस आहेत. त्यामधील 16 हजार 248 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
अमेरिकेतील 90 हजार मृतांपैकी एक तृतीयांश मृत्यू हे न्यूयॉर्क शहरातील आहेत. अमेरिकेपाठोपाठ युकेमध्ये कोरोनाबळींची संख्या सर्वाधिक आहे. युकेमध्ये 2 लाख 40 हजार 161 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 34 हजार 466 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









