मुलीचे पहिले छायाचित्र शेअर करत दिली खूशखबर
बॉलिवूड अभिनेत्री एवलिन शर्माच्या घरी नवी पाहुणी दाखल झाली आहे. एवलिनने एका मुलीला जन्म दिला आहे. ही खूशखबर तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
एवलिन सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असते. ती वारंवार स्वतःची छायाचित्रे आणि चित्रफिती शेअर करत असते. मी एका प्रेमळ मुलीची आई झाल्याचे सांगत एवलिनने मुलीचे पहिले छायाचित्र प्रसारित केले. तसेच मुलीच्या नावाचीही वाच्यता केली आहे.

‘माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्तिरेखा, ‘एवा भिंडी’ची आई होणे’ असे तिने नमूद केले आहे. एवलिनने मुलीच्या जन्मासाब्sातच इन्स्टाग्राम प्रोफाइलही तयार केले आहे. एवलिनच्या या पोस्टवर तिचा मित्रपरिवार तसेच चाहतेही शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
एवलिनने जून महिन्यात स्वतःचा प्रियकर तुषान भिंडीसोबत विवाह केला होता. तुषान आणि एवलिन दीर्घकाळापासून परस्परांना डेट करत होते. विवाहाचे अनेक छायाचित्रेही एवलिनने सोशल मीडिया अकौंटवर शेअर केली होती.









