प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात अनेक मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे.त्यापैकी अलका कुबल प्रोड्क्शनच्या सोनी मराठी चॅनेल आई माझी काळूबाई मालिकेचे चित्रीकरण जिह्यात फलटण, कोरेगाव, सातारा आणि वाई या चार तालुक्यातील काही गावांमध्ये झाले.त्याच चित्रीकरणादरम्यान आठ दिवसांपूर्वी जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची बाधा झाली.त्या वयाने जास्त असल्याने त्यांना सातारा येथील सातारा हॉस्पिटलमध्ये उपचार सूरु आहेत.त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्या व्हेंटिलेटरवर आहेत, अशी खात्रीपूर्वक माहिती आहे.त्यांना कोरोनाची बाधा मुंबई येथून आणलेल्या नृत्याच्या समूहाकडून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, चित्रीकरणातले 27 बाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आई माझी काळूबाई या मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरण नियम व अटी पाळून करण्यात येत होते.असे तेथील काही जण सांगतात.जिह्यातील फलटण तालुक्यातील आदरकी येथील एका फार्म हाऊसवर तर हिंगणगाव येथे, कोरेगाव तालुक्यातील वाठार येथे तर सातारा तालुक्यातील सोनवडी गजवडी लगत असलेल्या भाई वांगडे यांच्या कॉलेज परिसरात आणि वाई तालुक्यातील मांढरदेव येथे झाल्याचे समजते.याच चित्रीकरणादरम्यान मुंबई येथून कलाकार येजा करत होते.सुरुवातीला हिंगणगाव येथील चित्रीकरणादरम्यान काही जण बाधित आढळून आल्याचे समजताच तेथील ग्राम दक्षता समितीने संबंधित निर्माता, दिग्दर्शक यांना समज दिल्याचे समजते.त्यांनंतर एका ठिकाणी मागच्या आठ दिवसांपूर्वी चित्रीकरण सुरू असतांना काही जणांना त्रास जाणवू लागला.त्यामुळे त्यांच्या तपासणी केली.त्यामध्ये अभिनेत्री आशालता यांच्यासह 27 जण पॉझिटिव्ह आले होते.आशालता यांना सातारा येथील सातारा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.गेल्या आठ दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.त्यांना व्हेंटिलेटरवर ठेंवण्यात आले आहे, असे प्रशासनाने सांगितले.
इतर काही चित्रीकरणात कोरोना बाधित?
जिह्यात काही ठिकाणी चित्रीकरण सुरू आहेत.त्यांतील काही कलाकार हे नियम पाळत नाहीत.अगदी स्वतःला काय दुखते तेही लपवून चित्रीकरणात सहभागी होतात.त्यामुळे काहीजण कोरोना बाधित झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.