ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता रणबीर कपूर आणि चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्यानंतर आता अभिनेता मनोज बाजपेयीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर ते विलगिकरणात गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज बाजपेयी हे सध्या आपल्या नव्या वेब सीरीजमुळे चर्चेत आहेत. वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन 2’ची चाहत्यांची खूप प्रतीक्षा होती. अशा परिस्थितीत अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे, त्यांचे चाहते अस्वस्थ झाले आहेत.
अभिनेते मनोज बाजपेयी यांनी आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे. ते नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. अशा परिस्थितीत चाहते आता, मनोज बाजपेयी यांना लवकरात लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना करत आहेत.
दरम्यान, सध्या मनोज बाजपेयी त्यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग करत होते, असे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान, त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे कळते आहे. आता या चित्रपटाचे शूटिंग तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे.
या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर अभिनेता मनोज बाजपेयी यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती, या चाचणीचा अहवाल सकारात्मक आला आहे, असे मनोज बाजपेयी यांच्या टीमने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.









