वृत्तसंस्था/ अबुधाबी
2020 च्या एफ-1 ग्रां प्रि मोटाररेसिंग हंगामातील येथे होणाऱया शेवटच्या अबुधाबी ग्रां प्रि शर्यतीसाठी शुक्रवारी झालेल्या पहिल्या सराव सत्रात हॉलंडचा चालक मॅक्स व्हर्स्टापेनने आघाडीचे स्थान मिळविताना बोटासला मागे टाकले आहे.
रेडबुल चालक व्हर्स्टापेनने या सराव सत्रात 1 मिनिट 37.378 सेकंदाचा अवधी घेत मर्सिडीज संघातील फिनला तसेच बोटासलाही मागे टाकले. या सराव सत्रामध्ये आतापर्यंत सातवेळा विश्वविजेतेपद मिळविणारा ब्रिटनचा लेविस हॅमिल्टन पाचव्या स्थानावर राहिला.









