प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोना रूग्णांची होणारी वाढ चिंता वाढवणारी ठरत आह़े मंगळवारी तब्बल 337 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आह़े तर 5 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आह़े नागरिकांनी कोणतेही लक्षण असल्यास तपासणी करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आह़े
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये 1 हजार 232 कोरोना चाचण्या घेण्यात आल्य़ा यात आरटीपीसीआर टेस्टमध्ये 237 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये केवळ 100 असे एकूण 337 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळल़े यात रत्नागिरी तालुक्यात 142, दापोली 41, खेड 40, गुहागर 9, चिपळूण 57, संगमेश्वर 25, लांजा 18 व राजापूर 5 असे रूग्ण आढळून आल़े यामुळे जिह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या आता 13 हजार 297 इतकी झाली आह़े तर 111 बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात आल़े यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या आता 11 हजार 233 पर्यंत पोहोचली आह़े बरे होण्याचे प्रमाण 84.47 इतके आह़े तर दापोलीमधील 83 वर्षीय 65 व 57 वर्षीय पुरूष रूग्णांचा मृत्यू झाला तर रत्नागिरीमधील 65 वर्षीय महिला व 52 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाल़ा यामुळे जिह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या आता 408 इतकी झाली आह़े कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या तालुकानिहाय आकडेवारीनुसार रत्नागिरी 103, खेड 61, गुहागर 14, दापोली 46, चिपळूण 97, संगमेश्वर 46, लांजा 14, राजापूर 21, मंडणगडात 6 जणांचा मृत्यू झाला आह़े जिह्यातील एकूण मृतांची संख्या 408 इतकी पोहोचली असून मृत्यूदर 3.06 इतका आह़े
शहरालगतच्या मॉलमध्ये 10 कोरोना पॉ†िझटिव्ह
रत्नागिरी शहरालगत असलेल्या मॉलमध्ये 10 कर्मचारी कोरोना पॉ†िझटिव्ह असल्याचे आढळले आहेत़ मागील आठवडय़ात या मॉलमधील सर्व कर्मचाऱयांना कोरोना चाचणी करण्याच्या सूचना व्यवस्थापनाने केल्या होत्य़ा त्यानुसार कोरोना चाचणीत हे रूग्ण कोरोना पॉ†िझटिव्ह असल्याचे आढळल़े दरम्यान हा मॉल सॅनिटाईज करून सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कोरोना चाचणीसाठी आता मोबाईल व्हॅन
कोरोना चाचणीसाठी जिह्यात आता मोबाईल व्हॅनची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आह़े जिल्हाधिकारी कार्यालय येथील आपत्ती व्यवस्थापन विभागातील (02352-226248) क्रमांकावर संपर्क केल्यास मोबाईल व्हॅन रूग्णाच्या घरी पाठवण्यात येईल़ या ठिकाणी रूग्णाची कोरोना चाचणी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
एकूण रूग्ण -13297
नवे रूग्ण -337
मृत्यू -05
एकूण मृत्यू -408









