ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानातील कुंडुझ प्रांतात शिया मुस्लिमांच्या गोझर-ई-सायेद आबाद मशिदीमध्ये शुक्रवारी नमाज सुरू असताना हल्लेखोराने आत्मघातकी स्फोट घडवून आणला. या स्फोटात 46 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक नागरिक जखमी आहेत. काहींची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अफगाणिस्तानात शिया मुस्लिम आणि तालिबानला लक्ष्य करत हल्लेखोरांनी गोझर-ई-सायेद आबाद मशिदीत आत्मघातकी स्फेट घडवून आणला. या स्फोटात 46 जणांचा मृत्यू झाला असून, काही लोक गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्फोटानंतर परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने (IS) घेतली आहे. शिया मुस्लिमांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले करण्यासाठी आयएस कुख्यात आहे. दरम्यान, शिया समुदायाला संपूर्ण संरक्षण पुरविण्यासाठी तालिबान कटिबद्ध आहे, असे तालिबान प्रशासनाने म्हटले आहे.