गणपत गल्ली येथील घटना, मोटार सायकल ताब्यात
प्रतिनिधी/ बेळगाव
मोटार सायकलची धडक बसून दोन वर्षांचा बालक जखमी झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी गणपत गल्ली येथे ही घटना घडली असून वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांनी मोटार सायकल ताब्यात घेतली आहे.
कानात हेडफोन घालून मोटार सायकल चालविणाऱया युवकामुळे हा अपघात घडला आहे. जखमी बालकाला खासगी इस्पितळात हलविण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यंत त्याचे नाव समजू शकले नाही. अपघातानंतर बाजारपेठेत गर्दी जमली होती. शुक्रवारी रात्री वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांशी संपर्क साधला असता बालकाला धडक देणारी मोटार सायकल ताब्यात घेण्यात आली आहे. त्या बालकावर नेमके कोणत्या इस्पितळात उपचार सुरू आहेत याची माहिती मिळाली नाही असे अधिकाऱयांनी सांगितले.









