मुंबई \ ऑनलाईन टीम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोप प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात आता सक्तवसुली संचानालय अर्थात ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख यांची ईडीमार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्यावर दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आला. तसंच अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. तसंच, सचिन वाझे यांच्या नियुक्तीत अनिल देशमुख यांचा हात असल्याचेही एफआयआरमध्ये कॉपीमध्ये नमूद करण्यात आले आहे. एवढंच नाहीतर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका सुद्धा अनिल देशमुख यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Previous Articleटिळकवाडी, शहापूर, अनगोळ, वडगाव सुनेसुने
Next Article सोमवारी जिल्हय़ात 644 नवे रुग्ण








