अलाया फर्निचरवालाचे वक्तव्य
अभिनेत्री अलाया फर्निचरवाला सध्या स्वतःचा आगामी चित्रपट ‘यू-टर्न’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अलाया एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. महिलेच्या व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवून अधिकाधिक चित्रपट तयार केले जात आहेत. अशाच एका चित्रपटात सहभागी होता आल्याने मी आनंदी असल्याचे अलायाने म्हटले आहे.
चित्रपटउद्योगात गोष्टी बदलत आहेत. सध्या अनेक चित्रपट महिलांची भूमिका मध्यवर्ती स्थानी ठेवून तयार केले जात आहेत. माझ्या पहिल्याच चित्रपटापासून उत्तम भूमिका मिळाल्याने मी सुदैवी ठरले आहे. चित्रपटसृष्टीत मला अद्याप मोठा पल्ला गाठायचा असल्याचे अलाया म्हणाली. अलायाने ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. यानंतर ती ‘प्रेडी’, ‘लगभग प्यार विथ डीजे मोहब्बत’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अलाया ही अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे.
कुठल्याही चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याचा मोठा दबाव असतो. कारण निर्मात्यांना कलाकारांकडून मोठय़ा अपेक्षा असतात. याचमुळे दबावही मोठय़ा प्रमाणात असतो. एकता कपूर ‘यू-टर्न’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. त्यांच्याकडून मला आतापर्यंत मोठा पाठिंबा मिळाल्याचे अलाया म्हणाली.