प्रतिनिधी / सांगली
भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती दिनानिमित्त सांगली मध्ये शुक्रवारी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. भाजपचे नेते व नगरसेवक शेखर इनामदार यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेवक सुब्राव मद्रासी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.








