प्रतिनिधी /बेळगाव
लॉकडाऊननंतर तब्बल 55 दिवसांनी वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाकडून बसप्रवास सुरू झाला असल्याने प्रवाशांचा जीव भांडय़ात पडला. एका बसमध्ये 30 प्रवासी बसण्यास मुभा देण्यात आली होती. त्यामुळे गर्दी टाळून नियमांचे पालन करण्यात आले.


उपनगर व ग्रामीण भागात काही बस आज सोडण्यात आल्या. प्रवासी संख्या जरी कमी असली तरी तिकीट दर मात्र जैसे थे होते, असे डेपो नियंत्रणाधिकाऱयांनी सांगितले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात चौकोन आखण्यात आले होते. प्रवाशांची नावनेंदणी व थर्मल स्कॅनिंग करून हाताला सॅनिटायझर लावण्यास देण्यात आले. तेंडाला मास्क बांधल्याशिवाय आत प्रवेश करण्यास मनाई केली. वायव्य राज्यपरिवहन मंडळाकडून ऍडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आले आहे.









