कणकवली /प्रतिनिधी-
जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच अचानक बेपत्ता झालेले जिल्हा बँक निवडणुकीतील मतदार तथा तळेरे येथील रहिवासी प्रमोद महिपत वायंगणकर हे सोमवारी स्वतःहूनच कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाले. आपणाला कुणीही गायब केले नव्हते. आपण स्वतःहूनच येथून निघून गेलो होतो. या काळात पुणे येथे वास्तव्य केले, असे वायंगणकर यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी वायंगणकर यांचा जबाब घेतला व त्यांना कुटुंबियांकडे सुपूर्द केले. वायंगणकर हे 19 डिसेंबरपासून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता होण्यामागे आमच्या विरोधकांचा हात असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता.









