प्रतिनिधी / बेळगाव
जीआयटी कॉलेजची विद्यार्थिनी अक्षरा मुंदडा हिने सादर केलेला प्रकल्प कॉलेजने बेस्ट ग्रॅज्युएशन थिसीस म्हणून निवडला आहे. यामुळे अक्षरा आफ्रिकेच्या इथोपिया येथे होणाऱया आंतरराष्ट्रीय आर्चिप्रिक्स स्पर्धेमध्ये कॉलेजचे प्रतिनिधित्व करणार आहे.
अक्षरा ही जीआयटीमध्ये आर्किटेक्ट विभागात तिसऱया विभागात शिकत आहे. तिला या प्रकल्पासाठी रितेश धर्मायत, पद्मा संगोळी, अमित प्रसादी व निशिता तडकोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. आर्किटेक्चर म्हणजेच स्थापत्य कलेत काळानुरुप कसे बदल घडत गेले. ‘जागा, वेळ आणि अस्तित्व स्थापत्य कलेमध्ये कसे’ या विषयावर अक्षराचा प्रकल्प आहे. या स्पर्धेसाठी भारतातून 22 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. जागतिक स्तरावर 140 हून अधिक देशांचे स्पर्धक यामध्ये सहभागी होणार आहेत. अक्षरा ही सुमन व चार्टर्ड अकौंटंट राजेंद्र मुंदडा यांची कन्या आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.









