अक्रूराला द्वारकेतून आपल्या अनुमतीने पळवला याला कारण तरी काय?
शाधन्व्याचे प्रयोजक । हेही दोघे शत्रु देख । तद्वत यांचा वध निष्टंक । भामा सशोक करवील । जरी प्रियेचें मानस धरूं । तरी निजभक्तातें केंवि मारूं। ऐसा विवरूनियां विचारु । कृष्णें अक्रूर पळविला। न मारितां अक्रूराप्रति । भंगेल सत्यभामेची प्रीति। यावजन्म विकल्पावाप्ती । हें जाणोनि श्रीपति त्यां पळवी । भक्तकैपक्षी श्रीहरि । हे बिरुदाची प्रकट थोरी । भक्तापराधिया अवश्य मारी । तर्की अंतरिं कृतवर्मा । शतधन्व्यासि आमुचा बोध । तेणें सत्राजिताचा केला वध । सर्वज्ञ जाणे श्रीमुकुंद । तैं मरणखेद कीं आम्हां । कृतापराधाची धुकधुक । केंवि हरीतें दाविजे मुख । यालागिं होऊनि सशंक। न कळत देख पळाला । विकल्पाचे हेतु इतुके । क्षाळावया जगन्नायकें । कैवाड रचिलें तें हें निकें । नृपा श्रीशुकें निरूपिलें तें हें स्यमंतकाख्यान ।
अक्रूर व कृतवर्मा हे दोघे शतधन्व्याचे प्रायोजक असून त्यांच्या विपरीत सल्ल्यावरून त्याने आपले वडील सत्राजित याचा वध केला, हे जर सत्यभामेला कळेल तर ती त्यांनाही ठार मारण्याचा आग्रह धरेल असे कृष्णाला वाटले. कृष्णाचे अक्रूरावर प्रेम होते. अक्रूर कृष्ण भक्त म्हणून प्रसिद्ध होता. सत्यभामेने अक्रूराला मारण्याचा आग्रह धरला तर त्याला वाचवायचा कसा? देव भक्तांचा रक्षणकर्ता व पक्षपाती आहे. अक्रूराचा जीव कसेही करून वाचविलाच पाहिजे, हा विचार करून कृष्णाने अक्रूराला द्वारकेपासून दूर पळवला.
मणिप्रसंगकथाकथन । मणि लक्षून निरूपण । अक्रूराकडील परिसा हो । राहो कृतर्म्याची गोठी । अक्रूरें जाऊनि जाह्नवीतटीं । काशीक्षेत्रें केली रहाटी। संमत श्रे÷ाrं सर्वत्र । तेचि रहाटी म्हणाल कैसी । अक्रूरें वसोनि वाराणसी । दानपति या अभिधानासे। प्रकट केलें सर्वत्र । अहरह कनकभार अष्ट । स्यमंतकमणि प्रसवे श्रे÷ । अक्रूर परम स्वधर्मनि÷ । तेणें अभीष्ट मख यजिले ।दानपतिनामा पैं यजमान। र्क्मवेदिकामंडित यज्ञ । साङ्गोपाङ्गविधानज्ञ । करी म्हणोन जन वदती । पुन्हा कोण्ही म्हणती ऐसें। येथें कृष्णेंचि स्थापिला असे । दिव्ययज्ञांच्या उद्देशें। गुह्य आपैसें हें कथितो । ऐसी जनाची गुजगुज । येथें कृष्णाचें रहस्य गुज। तेंही राया कथितों तुज । ऐकें सहज सिंहदृशा ।
गंगा नदीच्या काठावर वाराणसी म्हणजेच काशी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. अक्रूर द्वारकेतून पळाला तो या वाराणसी क्षेत्री येऊन राहिला. त्याच्यापाशी शतधन्व्याने मरणापूर्वी दिलेला स्यमंतकमणी होता. हा स्यमंतकमणी दररोज आठ भार सोने प्रसवत असे.
या सोन्याचा उपयोग करून अक्रूर मोठय़ा प्रमाणावर यज्ञयाग, दानधर्म करू लागला. एक मोठा दाता म्हणून त्याची कीर्ति सर्वत्र पसरली. काही लोक मात्र आपापसात कुजबुजत की कृष्णानेच दानधर्म करण्यासाठी याला काशी नगरीत पाठवला असावा. हे सगळे घडण्यामागे कृष्णाच्या मनात काय होते हे राजा मी तुला सांगतो असे महामुनी शुकदेव परिक्षितीला सांगतात.








